ग्रंथाचे केवळ वाचन न करता त्यातील प्रत्येक सूत्र कृतीत आणून आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकण्यास प.पू. डॉ. आठवले यांनी सांगणे
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘हे कृपाळू गुरुदेव, ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथाचा अभ्यास कसा करावा ?’, याचेही ज्ञान आपण मला प्रदान केले. आपण मला म्हणालात, ‘‘अभ्यास करतांना निव्वळ तात्त्विक माहिती समजून घेतली’, असे नको. एका वर्गात साधकांना ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथाचा अभ्यास करण्यास सांगितले होते. एक मासाने (महिन्याने) पुन्हा अभ्यासवर्ग घेतला. त्या वेळी ‘भावजागृतीसाठी साधना’ हा ग्रंथ किती जणांनी अभ्यासला ?’, असे विचारल्यावर एक साधिका सोडून सर्वांनी हात वर केले. त्या साधिकेला एखादी कृती सांगितली की, सर्वांत आधी ती कृतीत आणत असे. त्यामुळे त्या साधिकेने हात वर न केलेला पाहून मला आश्चर्य वाटले आणि ‘या वेळी ती साधिका मागे का राहिली ?’, असा प्रश्न उपस्थित झाला. त्या साधिकेला विचारले असता ती म्हणाली, ‘‘एक मासात हा ग्रंथ अभ्यासणे मला शक्य झाले नाही. प्रत्येक सूत्रावर कृती करून अनुभव घेण्यास वेळ लागत आहे.’’ म्हणजे खर्या अर्थाने ग्रंथाचा अभ्यास तीच करत होती. ‘‘याला म्हणतात ‘अभ्यास !’ असा अभ्यास कर’, अशी आज्ञा आपण मला दिली होती.’’
– श्री. संतोष आनंदा गरुड, पर्वरी, गोवा. (२३.६.२०१७)