चंद्रपूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण
महिला सूत्रधाराला अटक; ३ दिवसांची पोलीस कोठडी !
चंद्रपूर – येथील ब्रह्मपुरी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नागपूर येथील मुख्य सूत्रधार सिमरन उपाख्य अक्षदा ठाकूर (वय २६ वर्षे) हिला १ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी अटक केली. तिला येथील न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मुलीवर अत्याचार करणारे लोणारे दांपत्यांसह ९ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
लोणारे दांपत्य कोलकाता येथून अपहरण करून आणलेल्या अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करून घेत होते. पोलिसांनी १७ सप्टेंबर या दिवशी सापळा रचून तेथे धाड टाकून तिची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी मानव तस्करी अधिनियम पोक्सो आणि पेटा कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करत मंजित लोणारे आणि चंदा लोणारे यांना अटक केली होती. लोणारे दांपत्याच्या पोलीस कोठडीत नागपूर येथील सिमरन ही मुख्य सूत्रधार असल्याचे अन्वेषणात उघड झाले होते. तेव्हापासून ती पसार होती.