प्रत्येक नागरिकाने ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ वाचून भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आर्थिक आक्रमण रोखावे !
देशाची अर्थव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हलाल प्रमाणित वस्तूंना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करायला हवा !
व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद’ या ग्रंथाचे केलेले समीक्षण
भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण करून अर्थव्यवस्था दुर्बल करण्याचा पद्धतशीर प्रयत्न ‘हलाल जिहाद’द्वारे केला जात आहे. याविषयी सविस्तर, शास्त्रशुद्ध आणि अनेक पुरावे असलेली माहिती ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद’ या ग्रंथात सांगण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय जनतेला साक्षर करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ग्रंथाचे संकलक श्री. रमेश शिंदे यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. त्याविषयी केलेली समीक्षणात्मक सूत्रे येथे देत आहे.
१. जगातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याचा अधिकार असणे; परंतु त्यांचा गैरवापर करून संपूर्ण मानवजातीला उपद्रव देण्याचा अधिकार कुणालाही नसणे
प्रत्येक राष्ट्राने आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे, हे नैसर्गिक आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याचा अधिकार आहे. तथापि त्याचा गैरवापर करून संपूर्ण मानवजातीला उपद्रव देण्याचा अधिकार कुणालाही देण्यात आलेला नाही. आर्थिक बळावर कुणीही कुणालाही स्वतःचा गुलाम करू शकत नाही, तसेच स्वतःचे विचार किंवा खाद्यसंस्कृती कुणीही कुणावरही लादू शकत नाही. ती तशी लादणे, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.
२. राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात लिहिलेला ग्रंथ !
आज आपण आधुनिक काळात वावरत आहोत. आपल्याला सर्वत्र भौतिक प्रगती दिसून येते. या पार्श्वभूमीवर राक्षसी प्रवृत्तीची जोपासना करणे, हा अक्षम्य अपराध आहे. असा अपराध हेतूत: करणार्या प्रवृत्तीच्या विरोधात हा ग्रंथ लिहिण्यात आला आहे.
३. मुसलमानांना हिंदु देवतेचा प्रसाद चालत नसेल, तर हिंदूंनी तरी हलाल भोजनाचा स्वीकार का करावा ?
मुसलमान समाजाला जी गोष्ट पवित्र वाटते, ती अन्य समाजाला पवित्र वाटेलच, असे नाही. त्यामुळे त्या समाजाने त्यांना पवित्र वाटणार्या गोष्टी अन्य समाजाच्या माथी मारणे हे योग्य ठरत नाही. वर्ष २००७ मध्ये मध्यप्रदेश शासनाने ‘इस्कॉन’ मंदिराला शाळेतील माध्यान्ह भोजन पुरवण्याचे कंत्राट दिल्यावर त्याला मुसलमानांनी विरोध केला. मुसलमान मौलवींनी (इस्लामच्या धार्मिक नेत्यांनी) दावा केला की, ‘इस्कॉन’ संस्था शिजवलेले अन्न प्रथम जगन्नाथाला अर्पण करते. त्यामुळे हिंदु देवतेचा प्रसाद मुसलमानांना खाऊ घालणे, हा इस्लामचा अपमान आहे. जर ‘इस्कॉन’ने शिजवलेले माध्यान्ह भोजन मुसलमान स्वीकारणार नसतील, तर हिंदूंनी हलाल भोजन का स्वीकारावे ?
४. हलाल अर्थव्यवस्थेचा भीषण परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत असणे
हलाल अर्थव्यवस्था संपूर्ण जगात स्वतःचा दबदबा निर्माण करत आहे. तिने अल्पावधीत २ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. संपूर्ण जगात हलाल अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. शरीयतवर आधारित एक अर्थव्यवस्था जगात उभी रहात आहे. या अर्थव्यवस्थेचा भीषण परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे.
५. हलाल पद्धत पशूसाठी सर्वाधिक वेदनादायी असल्याचे न्यूझीलंडच्या मॅसी विद्यापिठात संशोधनकर्त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध करणे
जगात मांसाहार करणार्यांची संख्या बरीच आहे. ‘हलाल पद्धतीने गळा कापलेल्या पशूला सर्वाधिक वेदना सहन कराव्या लागतात’, असे वर्ष २००९ मध्ये न्यूझीलंडच्या मॅसी विद्यापिठात संशोधन करणार्या क्रेग जॉन्सन आणि त्यांचे सहकारी यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. अशा पद्धतीने उपलब्ध केलेले मांस मुसलमान समाजासाठी पवित्र असले, तरी अन्य समाजासाठी ते पवित्र नाही. असे असतांनाही हलाल प्रमाणपत्र दिलेले मांसाहारी पदार्थ सर्वत्र विकले जात आहेत.
६. युरोप देशांमध्ये हलाल पद्धतीवर बंदी घातली जाणे
हलाल पद्धत अमानवी असल्याचे सिद्ध झाल्यावर डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि इंग्लंड अशा अनेक देशांमध्ये सचेत पशूला हलाल करण्यावर वर्ष २०१७ मध्ये कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. यावर मुसलमानांनी न्यायालयात दाद मागितली. वर्ष २०२० मध्ये न्यायालयाने या कायद्याचे समर्थन करून हलाल पद्धतीने केली जाणारी पशूहत्या बंद करण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे युरोप देशांमध्ये हलाल पद्धतीवर बंदी घातली गेली आहे.
७. हलाल प्रमाणपत्राच्या षड्यंत्राचे उगमस्थान म्हणजे इस्लामी विचारसरणीच असणे
‘हलाल अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या पैशांचा उपयोग ऑस्ट्रेलियात शरीयत कायदा लागू करणे आणि कट्टरतावादी संघटनांना साहाय्य करणे यांसाठी केला जातो’, असा संशय ऑस्ट्रेलियातील नॅशनल्स पक्षाचे खासदार जॉर्ज क्रिस्टेन्सेन यांनी केला आहे. प्राध्यापक डॉ. ताज हार्गी, ब्रिटीश इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आणि प्राध्यापक हलाल प्रमाणपत्राविषयी म्हणतात, ‘‘हलाल प्रमाणपत्राच्या षड्यंत्राची उगमस्थाने सौदीचे वहाबी कट्टरवादी, इजिप्तच्या इस्लामिक ब्रदरहूडची सलाफी विचारसरणी, तसेच भारत आणि पाकिस्तान येथील सुन्नी कट्टरपंथीय ही आहेत. ब्रिटनमध्ये इस्लामी कट्टरतावादाचे मागच्या दाराने प्रवेश करण्याचे हे षड्यंत्र आहे.’’
८. भारतात हलाल प्रमाणपत्र देणार्या ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ या संघटनेने बाँबस्फोट करणार्या आरोपींना निरपराध ठरवण्यासाठी साहाय्य करणे
भारतात हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ ही मुख्य संघटना आहे. तिने ११ जुलै २००६ चा मुंबई रेल्वे बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, जर्मन बेकरी, पुणे येथील बाँबस्फोट, २६ नोव्हेंबर २००८ चे मुंबईवरील आतंकवादी आक्रमण, मुंबईच्या झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, कर्णावती बाँबस्फोट अशा अनेक आतंकवादी प्रकरणातील आरोपींना निरपराध ठरवण्यासाठी साहाय्य केले आहे.
८ अ. आतंकवाद्यांना निरपराध ठरवण्यासाठी खटपट करणे संशयास्पद ! : एखाद्या निरपराध व्यक्तीवर अन्याय झाला असेल आणि तिच्यावर खटला भरला गेला असेल, तर तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी केलेले साहाय्य ग्राह्य ठरू शकते; पण पोलिसांच्या अन्वेषणात दोषी आढळलेल्या आतंकवाद्यांना निरपराध ठरवण्यासाठी खटपट करणे संशयास्पद आहे.
९. केरळच्या उच्च न्यायालयाचा अजब तर्क आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे त्यावरील मत !
हिंदु मंदिरांसमोर पशूबळी दिला जातो; पण याला केरळच्या साम्यवादी सरकारने विरोध केला. तसा कायदाही अस्तित्वात आणला. या कायद्याला केरळच्या उच्च न्यायालयाने संमती दर्शवली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. याविषयीच्या याचिकेवर भाष्य करतांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, ‘‘धर्माच्या आधारावर पशूची हत्या करणे अवैध आहे; पण तीच पशूहत्या मांस खाण्यासाठी करणे वैध आहे.’’ हा आश्चर्यकारक तर्क आहे. त्याचप्रमाणे मंदिरासमोर दिलेला पशूबळी जर चालत नाही, तर हलाल मांसासाठी अल्लाला अर्पण केलेला पशूबळी केरळ शासनाला कसा चालतो ?’’
१०. हलाल प्रमाणपत्र प्रमाणित कोणतीही वस्तू खरेदी करू नये !
केवळ मांसाहारी पदार्थांवरच हलालचे प्रमाणपत्र आढळत नाही, तर ते अन्य वस्तूंवर ज्या वस्तू मांसाहारी नाहीत किंवा ज्या वस्तूंच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्राण्याच्या मांसाचा उपयोग केला जात नाही, अशा वस्तूंवरसुद्धा हलाल प्रमाणपत्र लावण्यात आले आहे. जनतेने सजगपणाने आपण खरेदी करत असलेली वस्तू हलाल प्रमाणपत्राने प्रमाणित केलेली नाही ना, हे पडताळून पहावे आणि मगच खरेदी करावी. ‘हलाल प्रमाणपत्र प्रमाणित कोणतीही वस्तू आपल्याकडून खरेदी केली जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी’, असे आवाहन या ग्रंथाच्या माध्यमातून लेखक श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी.
११. देशाची अर्थव्यवस्था अबाधित रहावी; म्हणून ग्रंथाचा अधिक प्रचार करावा !
हा ग्रंथ प्रत्येक भारतीय नागरिकांनी वाचावा आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे आर्थिक आक्रमण रोखण्याचा कृतीशील प्रयत्न करावा. एवढी माफक अपेक्षा ठेवून हा ग्रंथ लेखकाने लिहिला आहे. हा ग्रंथ वाचल्याविना आपल्याला
हे आक्रमण रोखता येणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे; म्हणूनच या ग्रंथाचा देशाची अर्थव्यवस्था अबाधित रहावी; म्हणून अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा, हा प्रधान हेतू आहे. त्याला हिंदु बांधव उत्तम प्रतिसाद देतील, याविषयी निश्चिती आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२३.९.२०२२)
ग्रंथातील वाचनीय लिखाण
‘झोमॅटो’, ‘मॅकडोनाल्ड’ यांसारखी आस्थापने हिंदूंविषयी पक्षपाती व्यवहार करतांना आढळतात. याचे सप्रमाण उदाहरण या ग्रंथात पृष्ठ ६६ वर वाचायला मिळते. श्री. रमेश शिंदे यांनी हलाल अर्थव्यवस्थेला देशात आणि विदेशात होत असलेल्या विरोधाचे दाखले देणारे स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. त्याचप्रमाणे हलाल प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारणी कशी केली जाते, त्याचेही विवरण पृष्ठ ४० वर करण्यात आले आहे. हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या लढ्याचा वृत्तांत ११ व्या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळतो. आर्थिक जिहादच्या विरोधात वैध मार्गाने कसा लढा देता येतो, त्याचे मार्गदर्शनही ग्रंथात करण्यात आले आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ : मूल्य ४५ रुपये
‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी SanatanShop.com वर भेट द्या ! स्थानिक वितरकाचा संपर्क ः ९३२२३१५३१७ |