बालोद (छत्तीसगड) येथे साधूंचा वेश करून मुले चोरण्याच्या प्रयत्नात असणार्या दोघा मुसलमानांना अटक
बालोद (छत्तीसगड) – येथील गुरूर गावात भगवी वस्त्रे परिधान केलेल्या दोघा मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. मुसाफिर जोगी आणि याद अली अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या संशयास्पद वागण्यामुळे लोकांनी त्यांची चौकशी केली. या वेळी पोलिसांना बोलावल्यावर पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी ते हिंदू असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना गायत्री आणि महामृत्युंजय मंत्र म्हणण्यास सांगितल्यावर ते हे मंत्र म्हणू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी ते मुसलमान असल्याचे मान्य केले, तसेच मुलांची चोरी करण्यासाठी ते फिरत होते, अशी स्वीकृतीही दिली. साधूंचा वेश परिधान केल्याने कुणाला संशय येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ते दोघेही उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील नवादा गावातील रहाणारे आहेत.
Chhattisgarh: Two Muslim men posing as Hindu Sadhus arrested over suspicions of child theft, identity revealed after they failed to recite Gayatri Mantrahttps://t.co/BQPKNRf5RY
— OpIndia.com (@OpIndia_com) October 1, 2022
संपादकीय भूमिकाभगव्या रंगाची अॅलर्जी असणार्यांना गुन्हेगारी कृत्य करतांना मात्र भगव्याची अॅलर्जी होत नाही, हे लक्षात घ्या ! |