धनबाद (झारखंड) येथे मुसलमान तरुणाकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !
मुसलमान तरुणाने यापूर्वी दोन वेळा मूर्तींची तोडफोड केली होती !
धनबाद (झारखंड) – येथील जमडीहा गावातील शिवमंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची इम्तियाज अन्सारी या तरुणाने तोडफोड केली. मूर्तीची तोडफोड करत असतांना त्याला गावकर्यांनी पकडले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी इम्तियाज याला कह्यात घेतले. याच इम्तियाजने ६ मासांपूर्वी कोटालडीह गावातील एका मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली होती. तसेच १५ जानेवारी २०१६ या दिवशी नावाटांड गावामधील मंदिरातील मूर्तीचीही त्याने तोडफोड केली होती. दोन्ही वेळेला इम्तियाज याला चेतावणी देऊन सोडून देण्यात आले होते. या वेळी मात्र गावकर्यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी रांची येथेही एका हनुमान मंदिरात रमीझ अहमद या तरुणाकडून मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांनी तो ‘मनोरुग्ण’ असल्याचे म्हटले होते.
राँची के बाद अब धनबाद में मंदिर को बनाया निशाना, हनुमान जी की मूर्ति खंडित की: पहले भी दो बार मंदिरों में तोड़फोड़ कर चुका है इम्तियाज अंसारी#Jharkhand https://t.co/SNLVuWHiyI
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 1, 2022
धनबादच्या घटनेविषयी भाजपचे नेते बाबुलाल मरांडी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, नवरात्रीच्या काळात हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करणे हा योगायोग नाही, तर एका सुनियोजित षड्यंत्राचा भाग आहे. राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट आहे. ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातल्यानंतर देशात अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत.
झारखंड में रांची के बाद अब धनबाद के गोविंदपुर में मंदिर की प्रतिमा खंडित करने की खबर है।
दुर्गा पूजा में नवरात्रि के मंदिरों को निशाना बनाना संयोग नहीं, बल्कि सोची समझी साजिश का हिस्सा है।
यह झारखंड के सामाजिक सौहार्द को बिगाड़ कर राज्य को अशांत करने की साजिश है।@HMOIndia
— Babulal Marandi (@yourBabulal) October 1, 2022
संपादकीय भूमिकादोन वेळा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीची तोडफोड करूनही त्याला कठोर शिक्षा न झाल्याने आता त्याने तिसर्यांदा तोडफोड केली. आता पोलीस त्याला ‘मनोरुग्ण’ ठरवून सोडूनही देतील ! या उलट कुणी एखाद्या मुसलमानाच्या थडग्याची किंवा चर्चची तोडफोड केली असती, तर देशात काय झाले असते, हे वेगळे सांगायला नको ! |