त्रिनिदाद-टोबॅगो देशामध्ये हिंदूंच्या २ मंदिरांत तोडफोड
मंदिराच्या भिंतीवर बायबलमधील मूर्तीपूजेविरोधातील वाक्यही लिहिले !
नवी देहली – अमेरिका खंडाजवळील बेटांचा देश असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील त्रिनिदादमध्ये हिंदूंच्या २ मंदिरांमध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना गेल्या आठवड्यात घडल्याचे समोर आले आहे. काऊवा आणि पेनल या भागांत या घटना घडल्या.
Two Hindu temples vandalised and idols smashed within days in Trinidad, Biblical verses written on Kali Mandir walls, Ganesh Mandir lootedhttps://t.co/rNoRnGyoU7
— OpIndia.com (@OpIndia_com) October 1, 2022
१. काऊवा येथील कार्ली बे येथे श्री महाकाली मंदिरात अज्ञाताने मूर्तीची तोडफोड केली, तसेच मूर्तीवर ऑलिव्ह तेलही ओतले. यासह मंदिराच्या भिंतींवर बायबलमधील वाक्ये लिहिली. या वाक्यामध्ये मूर्तीपूजकांना चेतावणी देण्यात आलेली आहे. यावर मंदिराचे पुजारी पंडित सत्यानंद महाराज यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
२. पेनल भागात श्री गणेश मंदिरात तोडफोड केली, तर अन्य मूर्तींवरील वस्त्रे काढून टाकली. तोडफोड करणार्यांनी मंदिराच्या मागचे दार तोडून आता घुसून तोडफोड केली. दानपेटीलाही हानी पोचवली. पोलिसांना संशय आहे की, चोरीच्या उद्देशाने हा घटना घडली.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकाहिंदुबहुल भारतात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होते, तर विदेशात अल्पसंख्यांक असणार्या हिंदूंच्या मंदिरांत तोडफोड झाली, तर आश्चर्य ते काय ! ही स्थिती पालटण्यासाठी भारताची इस्रायलप्रमाणे पत आणि धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे ! |