जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जाणार ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
जळगाव येथे हिंदु राष्ट्र संघटन मेळाव्यानिमित्त पत्रकार परिषद !
जळगाव, ३० सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी २० वर्षे पूर्ण झाली. तिच्या द्विदशकपूर्तीनिमित्त जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी जळगाव येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रथितयश अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.