पुणे येथील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी वाहतूक मार्गांत पालट !
पुणे – बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडणार असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये १ ऑक्टोबरच्या रात्री ११ ते २ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत पालट करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.
जुना पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार आहे. हे काम करतांना आणि पूल पाडल्यानंतर तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्याविषयीचे आदेश दिले आहेत.