आता ‘गूगल’वरून करता येणार संस्कृतचे भाषांतर !
गूगल आणि ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ यांच्यात सामंजस्य करार !
नवी देहली – संस्कृत भाषेच्या प्रसार आणि प्रचार यांसाठी ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ने (‘आय.सी.सी.आर्.’ने) ‘गूगल’ या ‘सर्च इंजिन’ असणार्या संकेतस्थळाच्या आस्थापनाशी ‘सामंजस्य करार’ केला आहे. संस्कृत भाषेतील साहित्याचा इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आणि ‘मशीन लर्निंग’ यांचा वापर केला जाणार आहे. ‘मशीन लर्निंग’ ही संगणकाला शिकवण्याची एक प्रक्रिया असते, जेणेकरून संगणकाला कोणतीही सूचना न देता तो स्वतः काम करण्यास शिकेल.
Technology: ICCR Signs MoU With Google To Ease Search In Sanskrit #ICCR #MoU #Google #Sanskrit https://t.co/by8hCFMcLx
— Dynamite News (@DynamiteNews_) September 29, 2022
या अंतर्गत संस्कृतमधील सामान्यतः वापरल्या जाणार्या १ लाख ओळींचा इंग्रजी आणि हिंदी अनुवाद गूगलवर उपलब्ध केला जाणार आहे. यासाठी प्राध्यापक अमरजीव लोचन यांच्या नेतृत्वाखाली देहली विश्वविद्यालयातील संस्कृत विभागाचे विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्न करत आहेत.