विसर्जनानंतर देवतेच्या मूर्तीची छायाचित्रे काढून ती प्रसारित केल्यास कारवाई ! – मुंबई पोलीस
मुंबई – नवरात्रोत्सवानंतर ५ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पाण्यात विसर्जित केलेल्या मूर्तींची छायाचित्रे आणि चलचित्रे काढून त्यांचा प्रसार केल्यास धार्मिक भावना दुखावल्यावरून कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी २९ सप्टेंबर या दिवशी याविषयीचे पत्रक काढले आहे.
मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी काढलेले पत्रक (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
Mumbai: Photography of Durga idol immersion prohibited https://t.co/u2xlkI6CdU
— TOI Mumbai (@TOIMumbai) September 28, 2022
मुंबईमध्ये देवीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पाण्यात अर्धवट विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनार्यावर येतात किंवा तरंगतात. या मूर्ती महानगरपालिकेचे कर्मचारी गोळा करतात. विसर्जनाच्या प्रसंगाचे छायाचित्र काढणे, चलचित्र काढणे, प्रकाशित करणे आणि प्रसारित करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे.