केंद्र सरकारकडून ६७ अश्लील संकेतस्थळे बंद करण्याचा आदेश
नवी देहली – केंद्रीय दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवा पुरवठादारांना पॉर्नोग्राफीशी (अश्लील चित्रपटांशी) संबंधित ६७ संकेतस्थळे बंद करण्याचा आदेश दिला आहे. माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लघंन केल्याने देशातील २ उच्च न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवा देणार्यांना ४ पत्रे पाठवली आहेत, ज्यांमध्ये एकूण ६७ संकेतस्थळांवर कारवाई करण्याचा आदेश आहे.
The Indian government has ordered internet companies to block 67 pornographic websites following court orders and for violating the new IT rules that were issued in 2021https://t.co/OWCw5pDxMN
— WION (@WIONews) September 30, 2022
वर्ष २०१५ मध्येही सरकारने अशाच पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ८८ पॉर्न संकेतस्थळांवर कारवाई केली होती. याविषयी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर सरकारने नंतर ही बंदी उठवत केवळ लहान मुलांशी संबंधित पॉर्न संकेतस्थळांवर बंदी घातली होती.