श्रीमती मनीषा केळकर यांना आपत्कालीन भावसत्संग शृंखलेतील भावसत्संगात आलेली अनुभूती
१. आपत्कालीन भावसत्संग शृंखलेतील भावसत्संगात श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ सांगत असलेल्या ‘लहान मुलगी आणि शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य’ यांच्या गोष्टीशी एकरूप होऊन डोळ्यांतून भावाश्रू येणे
‘भावसत्संगरूपाने सर्वांना निःशंक आणि निर्भय करणार्या गुरुदेवांची महती अनुभवणार्या आपत्कालीन भावसत्संग शृंखलेतील येत्या भावसत्संगाला श्रद्धेने उपस्थित राहूया !’, अशी सूचना फलकावर लावली होती. हा पहिलाच भावसत्संग ध्वनीवर्धकावर (स्पिकरवर) लावण्यात आला होता. तेव्हा ‘सत्संग सेवा करत ऐकायचा’, असे मला वाटले आणि त्याप्रमाणे मी सेवा चालू केली; मात्र नंतर मी सत्संग एवढ्या एकाग्रतेने ऐकू लागले की, मी सेवा बाजूला ठेवून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सांगत असलेल्या ‘लहान मुलगी आणि शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य’ यांच्या गोष्टीशी एकरूप होऊन गेले. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
२. ध्वनीवर्धकामधून गोलाकार चैतन्याच्या लहरी चेहर्यावर येऊन संपूर्ण शरिरात जाणे आणि मनाची मरगळ दूर होणे
त्या वेळी ‘ध्वनीवर्धकामधून गोलाकार चैतन्याच्या लहरी माझ्या चेहर्यावर येत आहेत आणि माझ्या संपूर्ण शरिरात प्रक्षेपित होत आहेत अन् त्यामुळे मनाची मरगळ दूर होत आहे’, असे मला जाणवत होते. यातून ‘एकाग्रता साधल्यावर भावस्थिती अनुभवता येते’, हे मला शिकायला मिळाले.
परात्पर गुरुदेवांनी मला ही अनुभूती दिली; म्हणून मला भावसत्संगात भावस्थिती अनुभवता आली, यासाठी गुरुदेवांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता !’
– श्रीमती मनीषा केळकर, नागेशी, गोवा. (२.२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |