श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसाला गेल्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होऊन भावावस्था अनुभवणे !
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसापूर्वी २ दिवस मला फार त्रास जाणवत होता; पण ‘वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या सेवा करतात त्या खोलीत गेल्यावर तेथील चैतन्यामुळे हळूहळू माझा त्रास न्यून होऊ लागला. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ तेथे आल्यानंतर माझ्यावरचे त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत आहे’, असे मला जाणवले, तसेच माझ्या भावावस्थेत वाढ झाली.’
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |