करी मायेची पाखरण सदासर्वदा साधकांवरी ।
भाद्रपद अमावास्येला, म्हणजे २५.९.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस झाला. ‘त्यांच्या चरणी काव्यपुष्प अर्पण करावे’, असे मला वाटत होते. २५.९.२०२२ पर्यंत मला कविता सुचली नाही. २६.९.२०२२ ला सकाळी श्री गुरूंना आत्मनिवेदन केल्यावर पुढील काव्यपंक्ती सुचल्या. त्या आपल्या चरणी अर्पण करत आहे.
वदती तुम्हा माता सर्वांची ।
न होऊ देई आबाळ कुणाची ।। १ ।।
वसे मातेचे काळीज अंतरी ।
वात्सल्याची अन् करुणेची जाण साधकां ।। २ ।।
ऐसे लक्षण शास्त्रवचनी उपमा देती श्रीफळाची ।
बाह्यतः दिसे कठोर परि अंतरी मधुर जल ।। ३ ।।
परि तुम्ही तर बाह्यरंगी अन् अंतरंगी आहात सुमधुर ।
प्रसंगी होणे कठोर, जी असे केवळ कर्तव्यकठोरता ।। ४ ।।
श्री गुरूंचे (टीप) तत्त्व हृदयी नेई साधकां पुढे ।
वचन श्री गुरूंचे करी सार्थ योगक्षेम वहाण्याचे ।। ५ ।।
श्री गुरूंच्या कार्यावीण नसे दुजा विचार अंतरी ।
करी मायेची पाखरण सदासर्वदा साधकांवरी ।। ६ ।।
साधक ते समष्टी राधा अन् श्रीसत्शक्ति ।
गौरवती श्री गुरु अन् सप्तर्षि तुम्हा ।। ७ ।।
गुणगौरव करण्यास तोकडी मम लेखणी ।
वचने असती अनेक परि तुमच्यासम नसे दुजा कुणी ।। ८ ।।
कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पर्वणी ।
सदैव ऋणी रहावे तुमचे, हीच इच्छा मम मनी ।। ९ ।।
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |