भक्तीसत्संगात बोलतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीत जाणवलेले पालट
‘५.१०.२०१६ या दिवशी आश्विन शुक्ल चतुर्थी या तिथीपासून (नवरात्रीमध्ये) राष्ट्रीय स्तरावरील भक्तीसत्संगांना आरंभ झाला. तेव्हापासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भक्तीसत्संगांद्वारे साधकांना भाववृद्धीसाठी मार्गदर्शन करतात. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी लागू करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या भक्तीसत्संगातील बोलण्यात पुष्कळ पालट जाणवत आहे. भक्तीसत्संगात मार्गदर्शन करतांना त्यांच्या वाणीची जी विविध वैशिष्ट्ये लक्षात आली, त्याविषयीची त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधिका कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी यांनी दिलेली सूत्रे आणि त्या मागील आध्यात्मिक कार्यकारण भाव पुढील प्रमाणे आहे. त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे. २९.९.२०२२ या दिवशी आपण यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/616183.html
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे नेहमीचे बोलणे ( अन्य सेवा करतांनाचे बोलणे ) आणि भक्तीसत्संगातील बोलणे, यांतही पुष्कळ भेद जाणवण्यामागील अध्यात्मशास्त्र
निष्कर्ष
अशा प्रकारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ प्रत्येक आठवड्यात गुरुवारी घेत असलेल्या भक्तीसत्संगाचे महत्त्व आपल्या लक्षात येते. यावरून ‘संत आणि सद्गुरु यांच्या वाणीमध्ये सत्संग ऐकण्याचे आध्यात्मिक महत्त्व किती असते’, हे आपल्या लक्षात येते.
कृतज्ञता आणि प्रार्थना
‘यासाठी आम्ही साधक संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो. तुमची कृपादृष्टी आम्हा साधकांवर अशीच राहो’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२२)
(समाप्त)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |