पी.एफ्.आय.चा आर्थिक स्रोत बंद केल्याविना तिच्या आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘पी.एफ्.आय.’वर बंदी का आणावी ?’
मुंबई – ‘पी.एफ्.आय.’ला इस्लामी राष्ट्रांतून ‘फंडिंग’ (अर्थसाहाय्य) झाले आहे. ते बंद व्हायला हवे, तरच या आतंकवादी कारवाया थांबतील. जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी. जोपर्यंत तिचे आर्थिक मार्ग बंद होत नाहीत, तोपर्यंत आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत, असे प्रतिपादन सैन्यदलातील (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘पी.एफ्.आय.’वर बंदी का आणावी ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
हे पहा –
हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..
🟢 PFI को क्यों बैन करना चाहिए ?
_____________________________________
आतंकवाद्यांचे समर्थक करत असलेल्या खोट्या अपप्रचाराच्या विरोधात जनजागृती झाली पाहिजे ! – प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक (महाराष्ट्र)
वर्ष १९४७ मध्ये महंमद जिना याने अखंड भारताची विभागणी करून पाकिस्तान बनवले. त्याच धर्तीवर ‘पी.एफ्.आय.’चे इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आहे. आखाती देश ‘पी.एफ्.आय.’ला प्रत्येक मासाला कोट्यवधी रुपये पाठवतात आणि भारतात धर्म अन् जाती द्वेष पसरवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे केवळ ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालून या कारवाया बंद होणार नाहीत; कारण ही एक विचारधारा आहे. त्यामुळे ते पुन्हा वेगळ्या नावाने आतंकवादी कारवाया करत रहातील. यासाठीच केंद्राने ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा’ (यूएपीए) लागू केला आहे. या आधारे संघटनेचे नाव पालटून कारवाया करणार्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. आतंकवाद्यांवर न्यायपद्धतीने कारवाई होत असते, तरीही ‘मुसलमानांवर अत्याचार केले जात आहेत’, असा आतंकवाद्यांचे समर्थक कांगावा करतांना दिसतात. अशा खोट्या अपप्रचाराच्या विरोधात जनजागृती झाली पाहिजे.
संपादकीय भूमिकाजिहादी संघटनांवर बंदीची कारवाई करतांना त्यांची विचारधाराही समूळ नष्ट करायला हवी ! |