हिंदूंनो, जागे व्हा !
केंद्रशासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर धाडी टाकून संघटनेच्या एकूण ३०० जणांना अटक केली आहे. त्यानंतर शासनाने पी.एफ्.आय.वर बंदी घातली. वर्ष २०४७ पर्यंत देशाचे इस्लामीकरण करण्याचा या संघटनेचा हेतू आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत विविध राज्यांतील अनेक हिंदुत्वनिष्ठांना ठार केले आहे. देशात पी.एफ्.आय.वर बंदी घातली, तरी मूळ जिहादी प्रवृत्ती आहे तशीच आहे. सध्या ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस येत असूनही ती प्रकरणे दाबली जातात. हिंदु तरुणींच्या नाहक हत्या होत आहेत. नंदुरबार येथे विवाहित महिलेची दिवसा बळजोरीने हत्या करण्यात आली, अमरावतीमध्ये एका कुटुंबातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातून मुलीला नईम खान याने पळवून नेले.
जिहादच्या अंतर्गत हलाल जिहाद, लँड जिहाद, धर्मांध घडवत असलेल्या दंगली, मंदिरे आणि हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड अशा घडत असलेल्या अनेक घटना या हिंदूंना धोक्याची घंटा आहे. हिंदूंना जीव मुठीत धरून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सण आणि इतर उत्सव साजरे करावे लागत आहेत. आज हिंदु तरुणी बाहेर गेली, तर ती व्यवस्थित परत येईल कि नाही ? याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. पी.एफ्.आय.वर कारवाई केल्यानंतर ‘मुसलमानांवर अत्याचार होत आहे’, म्हणून काही राजकीय पक्ष आणि संघटना तिची बाजू घेत आहेत; मात्र ‘तिच्यावर केलेली कारवाई चुकीची आहे’, असे ठामपणाने कुणीही म्हटलेले नाही.
या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून हिंदूंनी रक्षणासाठी संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे. पूर्वी ‘रात्र वैर्याची आहे’, असे म्हणत होतो; मात्र आता दिवस-रात्र नव्हे, तर हिंदूंना ‘प्रत्येक क्षण वैर्याचा झाला आहे’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. हिंदूंच्या विरोधात कधी कोणती घटना घडेल, हे कुणी सांगू शकत नाही. देशात अनेक हिंदुविरोधी घटना घडत असतांना प्रत्यक्षात किती राजकीय पक्ष आणि पोलीस यंत्रणा हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून येतात, हा संशोधनाचा विषय आहे. हे हिंदूंनी गेल्या ७५ वर्षांत अनुभवले आहे. त्यामुळे ‘राजकीय पक्ष आणि पोलीस हिंदूंचे रक्षण करतील’, अशी आशा हिंदूंनी करू नये. जिहादी संघटना, लव्ह जिहाद, हलाल यांच्या विरोधात हिंदूंनीच संघटित होऊन वैध मार्गाने लढा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान ठेवून कृती केल्यास यश नक्की मिळेल !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई