छगन भुजबळ यांनी क्षमा मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करू ! – उमा खापरे, महिला राज्य अध्यक्षा, भाजप
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीदेवीच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या ‘भुजबळ फार्म’ येथे २९ सप्टेंबर या दिवशी धडक दिली आणि प्रवेशद्वारावर सरस्वतीची प्रतिमा ठेवून पूजन केले. भाजप महिला राज्य अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. ‘छगन भुजबळ यांनी वादग्रस्त वक्तव्याविषयी क्षमा मागावी, अन्यथा राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.