गरबा मंडपात मुसलमानांना प्रवेश देऊ नये – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
भोपाळ – नवरात्रोत्सव हा हिंदु धर्मातील सर्वांत मोठा सण आहे. नऊ दिवसांचे नवरात्र हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. यात मुसलमान धर्माच्या लोकांचे काम काय ? गरब्यात मुसलमानांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. एवढेच नाही, तर दुर्गापूजा मंडपांच्या आसपास त्यांची दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित सर्व वस्तूंवर बंदी घालावी, अशी मागणी भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चेच्या वेळी केली.
सांसद साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर ने कहा- गरबा में मुस्लिमों की एंट्री पूरी तरह से बंद हो,उनकी वस्तुएं वर्जित हो #bhopal #madhyapradesh #pragyathakur #memberofparliament #garba #भोपाल #मध्यप्रदेश #प्रज्ञाठाकुर #बीजेपीसांसद #मुस्लिम #गरबा https://t.co/aGUEewsqhF
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) September 28, 2022
गरब्याला येणार्या लोकांची ओळखपत्रे पाहिली पाहिजेत. आपल्या आपली उपासना पद्धत शुद्ध ठेवायची आहे. आपला भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, असे राज्यघटनेत लिहिलेले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येनुसार प्रत्येकाला आपल्या धर्मात आपल्या भावना व्यक्त करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार आहे, असेही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.