लातूर येथे मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा !
लातूर, २८ सप्टेंबर (वार्ता.) – लहान मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात गावोगावी फिरत असल्याची अफवा पसरवली जात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ‘मुलांना चोरणार्या महिला किंवा १० ते १२ व्यक्ती असून त्यांच्यापासून सावध रहा’, असे संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित केले जात आहेत. जिल्ह्यात कुठेही टोळी आल्याची नोंद नाही, तरी कुणालाही एखाद्या व्यक्तीविषयी संशय आल्यास जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. गैरसमजीतून नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.