चित्तावर होऊ दे अखंड साधनेचा संस्कार ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्ही आम्हा साधकांना जे दिले आहे, त्याप्रती शब्दांमध्ये कृतज्ञता व्यक्त होऊच शकत नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा जन्म घ्याल, तेव्हा मला तुमच्या सगुण किंवा निर्गुण रूपाची सेवा करण्याची संधी मिळाली, तरी मी स्वतःला कृपावंत समजेन.

श्री. वीरेंद्र मराठे

नाही मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांचे भय ।
चित्तावर होऊ दे अखंड साधनेचा संस्कार ।। १ ।।

मग जिवाचे कितीही जन्म झाले जरी ।
तो जीव साधनाच करील तरी ।। २ ।।

साधनेचा संस्कार राहील शाश्वत ।
जरी नाही झालो याच जन्मी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त ।। ३ ।।

– श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१३.११.२०२०)