हडपसर (पुणे) येथे ‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त प्रवचन ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने येथील हडपसरमधील ‘भोसले व्हिलेज’मध्ये ‘पितृपक्ष’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. समितीचे श्री. सागर शिरोडकर यांनी घेतलेल्या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. या वेळी ‘नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करा’, अशी मागणी सर्वांनी केली.
‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत पुणे येथे आतापर्यंत २२ हून अधिक ठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा, १२ ठिकाणी मंदिर स्वच्छता, २४ ठिकाणी प्रवचने आणि एकूण ४५ हून अधिक ठिकाणी फलकप्रसिद्धी असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील कोथरूड, सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, वारजे, सातारा रस्ता, आकुर्डी, पिंपरी गाव, वल्लभनगर, राजगुरुनगर, जुन्नर, हडपसर, नसरापूर, पेंजळवाडी, भोर आणि शिरवळ (जिल्हा सातारा) अशा विविध ठिकाणी वरील उपक्रम राबवण्यात आले आहेत. या उपक्रमांना विविध क्षेत्रांतील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभत आहे, तसेच प्रभावी हिंदूसंघटन होत आहे.