अद्याप ‘रझा अकादमी’ ही आंतकवादी संघटना शिल्लक आहे ! – आमदार नीतेश राणे, भाजप
मुंबई, २८ सप्टेंबर (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालणे, ही काळाची आवश्यकता होती. त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही आतंकवादी संघटना शिल्लक आहे. सर्वांना मिटवून टाका. हा आमचा भारत आहे, या शब्दांत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ‘रझा अकादमी’ या संघटनेवरही बंदी घालण्याची मागणी ट्वीटद्वारे केंद्र सरकारकडे केली.
आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करत थेट रझा अकादमी, पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनांवर आरोप केले आहेत. या संघटना समाजामध्ये विष कालवण्याचं काम करतात असा गंभीर आरोप केल्यामुळे आता पुन्हा एकदा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.@NiteshNRane pic.twitter.com/vfywF7sPWr
— SakalMedia (@SakalMediaNews) May 4, 2022