(म्हणे) ‘पी.एफ्.आय.’ प्रमाणेच सनातन आणि इतर धर्मांध संघटनांवर कारवाई होईल का ?’

सनातनद्वेषी आणि ‘पी.एफ्.आय.’प्रेमी निखिल वागळे यांची गरळओक

निखिल वागळे

मुंबई – केंद्र सरकारने ‘पी.एफ्.आय.’ या आतंकवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिंदुद्वेष्टे निखिल वागळे यांचा सनातनद्वेष परत एकदा उफाळून आला आहे. ‘पी.एफ्.आय.’प्रमाणेच जोरदार कारवाई सनातन आणि इतर धर्मांध संघटनांवर कारवाई होईल का ?’, असा प्रश्‍न उपस्थित करणारे ट्वीट करून त्यांची गरळओक केली आहे.

ट्वीटवर वागळे यांच्या विधानाचे जोरदार खंडण !

निखिल वागळे यांनी केलेल्या विधानाचे सामाजिक माध्यमांवरून जोरदार खंडण करण्यात आले आहे. सामाजिक माध्यमांच्या वापरकर्त्यांनी ‘वागळे यांच्यावरच का कारवाई करण्यात येऊ नये ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. अनेकांनी सनातन संस्थेच्या कार्याचे समर्थन केले असून ते सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे.

काही ट्वीट्स

१. नेशन फर्स्ट : तुझ्याकडे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत का ? असतील तर पोलिसांकडे जा ! नसतील तर देशातील सामाजिक वातावरण खराब केले; म्हणून तुझ्यावरच कारवाई का होऊ नये ?

२. अधिवक्ता हृषिकेश जोशी : ‘पी.एफ्.आय.’प्रमाणे ‘बामसेफ’ आणि ‘बिग्रेड’ या जातीद्वेष पसरवणार्‍या संघटनांवर बंदीची कारवाई व्हायला हवी. यांना ‘पी.एफ्.आय.’ सारख्या संघटनांची सुपारी आहे का ?, हे तपासायला हवे.

संपादकीय भूमिका

आजपर्यंत कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नाही. सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून ती हिंदु धर्माच्या प्रचारासाठी कार्यरत आहे. याउलट ‘पी.एफ्.आय.’चा अनेक हिंसक घटनांमध्ये समावेश असल्याचे पुढे आल्यानेच केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कोणताही पुरावे नसतांना केवळ सनातनद्वेषापोटीच निखिल वागळे अशी विधाने करत आहेत !