छगन भुजबळ यांनी सरस्वतीदेवीवर टीका केल्याचे प्रकरण ३ टक्के लोकांनीच सर्वांना शिकवले ! – महंत अनिकेतशास्त्री देशपांडे
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आक्षेपार्ह व्यक्त करून अज्ञान प्रकट केले आहे; कारण सावित्रीबाई फुले यांचा जो ‘काव्य फुले’ हा ग्रंथ आहे, त्यात ‘सावित्रीबाई फुले या स्वतः सरस्वतीदेवी आणि भगवान शंकर यांच्या पूजक आहेत’, असे जाणवते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी सरस्वतीदेवीविषयी काव्यरचना करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. त्यांच्या या काव्यावरून ‘शाळा हा सरस्वतीचा दरबार आहे’, असे सिद्ध होते. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य भुजबळ यांनी करू नये. सरस्वती ही पूर्ण विश्वाची देवी आहे आणि ३ टक्के लोकांनीच सर्वांना शिकवले आहे, हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन येथील महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी २८ सप्टेंबर या दिवशी केले.
अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपिठावर बोलतांना भुजबळ यांनी सरस्वतीदेवी आणि शारदामाता यांचे छायाचित्र लावले जाते. ‘ज्यांना आम्ही पाहिले नाही, ज्यांनी शिकवले नाही, असेलच शिकवले, तर ते केवळ ३ टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले. मग त्यांची पूजा कशासाठी करायची ?’, अशी टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे.