(म्हणे) ‘भाग्यनगर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्या मुसलमान महिला मनोरुग्ण !’ – पोलिसांचा दावा
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील खैराताबाद मध्ये २७ सप्टेंबर या दिवशी बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, या दोघी मनोरुग्ण आहेत. यापूर्वी या महिलांवर एका चर्चच्या बाहेरील मेरीची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. त्या वर्ष २०१८ मध्ये जेद्दा येथून भारतात परत आल्या होत्या. तेव्हापासून त्यांना मानसिक त्रास होत आहे.
माँ दुर्गा की मूर्ति तोड़ने वाली बुर्कानशीं महिलाओं को हैदराबाद पुलिस ने बताया ‘मानसिक बीमार’, भाई बोला – मेरी माँ और बहनों को सिज़ोफ्रेनिया है#Hyderabad #DurgaPujahttps://t.co/JDLWp4RO6N
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 27, 2022
१. या दोघा महिलांचा भाऊ असीमुद्दीन याने सांगितले की, माझ्या बहिणी मनोरुग्ण आहेत. त्यांनी यापूर्वी कधी असे केले नाही. मी क्षमा मागतो. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
२. या प्रकरणी नामपल्ली मतदार संघाचे आमदार जे.एच्. मेराज यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या मी या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीने या महिलांना मूर्तीची तोडफोड करतांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्या व्यक्तीवरही त्यांनी आक्रमण केल्याचा आरोप आहे.
संपादकीय भूमिका
|