पिंपरी (पुणे) येथे सांघिक स्तोत्रपठण स्पर्धेत ‘रामतांडव’ स्तोत्र प्रथम क्रमांकावर !
पिंपरी (पुणे) – ‘क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महिला सांघिक स्तोत्रपठण’ स्पर्धेमध्ये ‘रामतांडव’ स्तोत्राच्या सांघिक सादरीकरणाला रोख ५ सहस्र रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले. हा कार्यक्रम प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनामध्ये झाला. संस्कृत, मराठी आणि हिंदी यांपैकी एका भाषेची निवड करून १८ वर्षांवरील महिलांकरता सांघिक स्तोत्रपठण स्पर्धा झाली.
या स्पर्धेमध्ये १६ संघांच्या माध्यमातून २९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ‘सुप्रभातम्’, ‘महिषासुरमर्दिनी’, ‘कनकधारा’, ‘शिवतांडव’, ‘विष्णुसहस्त्रस्रनाम’ आदी स्तोत्रांचे पठण करण्यात आले.