गुरुदेवांचे स्मरण ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
एकदा मला आध्यात्मिक त्रास असह्य झाल्यावर मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी शरण गेलो. त्या वेळी मला प्रथमच पुढील कविता सुचली.
गुरुदेव तुमचे स्मरण ।
दाविती तुमचे चरण ।
याच चरणांवर येऊदे मरण ।। १ ।।
तुमचे चरण आणि तुमचे स्मरण ।
करती माझ्यातील अहंकाराचे हरण ।
तुम्हीच करता आमचे पालन पोषण ।। २ ।।
भावभक्तीने करीन निर्गुण तत्त्वाचे पूजन ।
उतराई मी होईन अखंड सेवा करून ।
तुमच्याच कृपेने मिळो त्यासाठी स्फुरण ।। ३ ।।
– श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |