श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधिकेने अनुभवलेली दैवी वैशिष्ट्ये !
भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने…
१. ‘श्री भवानीदेवी आणि श्रीसत्शक्ति बिंदा (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यात जाणवलेले साधर्म्य !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आणि श्री भवानीदेवीचे मुखमंडल (रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची मूर्ती आहे.) यांत मला कमालीचे साधर्म्य जाणवते. ‘त्या दोघी वेगळ्या नसून एकच आहेत’, असे मला अनुभवायला येते. दोघींकडे बघून माझा कृतज्ञताभाव जागृत होतो.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सर्व ठिकाणचे साधक, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांची विचारपूस करतात. तेव्हा ‘त्या साधकाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कृपेचे कवच प्राप्त होते’, असे मला वाटते.
३. भक्तीसत्संगात साधकांना गुरुभक्तीमध्ये चिंब भिजवणारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची स्वर्गीय दिव्य वाणी !
त्या प्रत्येक भक्तीसत्संगात सर्व साधकांवर गुरुभक्तीच्या अमृताचे सिंचन करतात. त्यांची ती अमृतमय दिव्य वाणी या कलियुगातील नसून ती स्वर्गीय दिव्य वाणी आहे. प्रत्यक्ष सरस्वतीदेवी आणि लक्ष्मीमाता गुरुदेवांचा महिमा वर्णन करत आहेत’, असे मला जाणवते. आम्हाला ‘भक्तीसत्संग संपूच नये’, असे वाटते. ‘त्या सर्व साधकांना गुरुभक्तीमध्ये चिंब भिजवून न्हाऊ घालतात’, असे मला वाटते.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची प्रीतीमय दृष्टी !
एकदा दसर्याच्या दिवशी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत होत्या. तेव्हा ‘त्या ठिकाणी सर्व देवता उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. साधकांना आरतीतील चैतन्य ग्रहण करता यावे, यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आरतीचे तबक साधकांना दाखवत होत्या. तेव्हा त्यांच्या दृष्टीतून मोठ्या प्रमाणात ‘वात्सल्यभाव प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. त्यांच्यातील चैतन्यामुळे ‘प्रत्येक साधकाच्या भोवती संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
५. रामनाथी आश्रमात यज्ञ होत असतांना ‘देवता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून सर्वांना आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे
महर्षींच्या आज्ञेनुसार आश्रमात यज्ञ होतात. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यज्ञस्थळी उपस्थित असतांना ‘देवता त्या ठिकाणी सूक्ष्मातून उपस्थित आहेत आणि त्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून सर्वांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवते. ‘यज्ञाच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामध्ये प्रकट होते’, असे मला जाणवते.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनही सहजभावात असतात.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कार्य आपल्या आकलनक्षमतेच्या पलीकडचे आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०२२)
|