भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी !
दिराचा खून करण्याची धमकी !
पुणे – भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास त्यांचे दीर बाबा मिसाळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. दोघांच्याही भ्रमणभाषवर संदेश पाठवून २ ते ५ लाख रुपयांची मागणी केली आहे. या प्रकरणी बिबबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून इमरान समीर शेख या व्यक्तीने संदेश पाठवून खंडणीची मागणी केली होती, तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली होती. शेख याच्या विरोधात बिबवेवाडी पोलिसांनी आयपीसी ३८६, आयटी ॲक्ट कलम ६६ (सी) अन्वये गुन्हे नोंद केले आहेत. शेख याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यातही गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.