पी.एफ्.आय.’च्या सदस्यांना शोधा आणि झोडा ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
नागपूर – देशविरोधी कार्य करणार्या पी.एफ्.आय. संघटनेवर केंद्र सरकारने कारवाई केली असून राज्य सरकारही कारवाई करत आहे. या संघटनेच्या सदस्यांना जिथे असतील तेथून शोधून झोडून काढावे. त्यासाठी कोणताही विलंब लावू नये. ज्या ठिकाणी अशा संस्था असतील, त्या बंद कराव्या. अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २६ सप्टेंबर या दिवशी येथे दिली.
बावनकुळे म्हणाले की, अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने पूर्व विदर्भासाठी १ सहस्र १८१ कोटी रुपये दिले आहेत. यापूर्वी एवढी हानीभरपाई कधीही मिळाली नाही. सरकारने दाखवलेल्या तत्परतेसाठी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन ! लवकरच शेतकर्यांना रोख मिळणार आहे.