शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचाच !
सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय !
मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे गटाचे कि एकनाथ शिंदे गटाचे ? याविषयी सर्वाेच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्यामध्ये न्यायालयाने याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असल्याचा निर्णय दिला आहे. २७ सप्टेंबर या दिवशी ही सुनावणी झाली. त्यामुळे पक्षचिन्हाच्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेईल.
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घोषित करू, नये अशी याचिका ठाकरे गटाने सर्वाेच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम्.आर्. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह या ५ सदस्यांच्या घटनापिठापुढे ही सुनावणी झाली.