रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण इत्यादी खात असाल, तर सावधान !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६४
‘झोपण्या-उठण्याच्या वेळा निश्चित नाहीत, व्यायाम नाही, नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, बाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती तुमची पूर्वपुण्याईच म्हणावी लागेल; परंतु लक्षात घ्या ! ही पूर्वपुण्याई संपली की, आता चालू असलेल्या चुकीच्या सवयींचे परिणाम रोगाच्या रूपाने दिसू लागतील. मग ‘त्या वेळी चांगल्या सवयी लावल्या असत्या, तर बरे झाले असते’, असे म्हणायची पाळी येईल. आपण साधक आहोत. शरीर निरोगी राहिल्यास साधना चांगली होते. त्यामुळे आपल्याला साधनेसाठी निरोगी शरीर हवे. शरीर निरोगी रहाण्यासाठी केवळ दोनच गोष्टी करा ! २ वेळा पुरेसा आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२२)