देशभरात पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर धाडी !

  • १०० हून अधिक जणांना अटक

  • शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), ९ राज्यांचे आतंकवादविरोधी पथक आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर धाडी टाकल्या. यात १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात देहलीमधून ३०, कर्नाटकातून ४५, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक केल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वीच्या पहिल्या धाडीमध्ये १५ राज्यांतून १०६ जणांना अटक करण्यात आली होती. पहिल्या धाडीमध्ये ज्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्या चौकशीत अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यानंतरच दुसर्‍यांदा या धाडी घालण्यात आल्या.

१.  ‘एन्.आय.ए.’ने देहलीच्या शाहीनबागमध्ये धाड टाकली होती. यानंतर येथे केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. त्याच वेळी महाराष्ट्रातून २७, कर्नाटकातील कोलारमधून ६ आणि आसाममधून २५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

२. आसाममधील ७ जिल्ह्यांतील कारवाईतून २५ कार्यकर्ते आणि नेते यांना अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कामरूप ग्रामीणमधून ५, गोलपारा येथून १०, करीमगंजमधून १, उदलगुरीमधून १, दरंगमधून १, धुबरी येथून ३ आणि बारपेटा येथून २ जणांना अटक करण्यात आली आहे.

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवायचे आहे !

अटक केलेल्यांकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये लिहिले आहे की, पी.एफ्.आय.ला भारताची सत्ता मिळवायची आहे. ‘वर्ष २०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करील, तोपर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे’, असे लिहिले होते. तसेच ‘केवळ १० टक्के मुसलमानांनी पाठिंबा दिला, तर ते भ्याडांना (हिंदूंना) गुडघ्यावर बसवतील. यासाठी त्यांच्याकडे ४ स्तराची संपूर्ण योजना आहे.

संपादकीय भूमिका

पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर केवळ धाडी टाकून उपयोग नाही, तर तिची पाळेमुळे समूळ नष्ट करून तिच्यावर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !