मिरज येथे ‘श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळा’चे विविध कार्यक्रम !
श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाला प्रारंभ !
मिरज, २६ सप्टेंबर (वार्ता.) – येथील ब्राह्मणपुरीमधील इतिहासप्रसिद्ध पुरातन अशा श्री अंबाबाई मंदिरामध्ये २६ सप्टेंबरपासून ‘श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवा’ला प्रारंभ झाला. सकाळी ८ वाजता श्री. देशपांडे (चंदूरकर) यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवामध्ये प्रतिदिन सकाळी ६ वाजता मंगलवाद्ये, श्री. दिलीप मुळे आणि सहकारी यांचे सनईवादन, तसेच देवीला सकाळी ७ वाजता अभिषेक आणि महापूजा करण्यात येईल. प्रत्येक रात्री ९.३० वाजता श्री. बजरंग मोहिते यांचे श्री देवीचे स्तवन, तसेच देवीची पालखी, आरती आणि मंत्रपुष्प सोहळा होणार आहे.