ही बिंदाआई..।
१. ‘संघर्षाशी निर्भीडपणे लढायला शिकवणारी ही बिंदाआई (टीप १) ।
२. प्रीतीची अखंड उब देणारी ही बिंदाआई ।
३. मायेतून अलगदपणे बाहेर काढणारी ही बिंदाआई ।
४. आम्हा पामरांच्या मनातील प्रत्येक विचार जाणणारी ही बिंदाआई ।
५. सनातनमधील प्रत्येक जिवाचा आधार असलेली ही बिंदाआई ।
६. प्रत्येक सजीव-निर्जीवात भगवंताला अनुभवणारी ही बिंदाआई ।
७. भगवंताकडे जलद गतीने घेऊन जाणारी ही बिंदाआई ।
८. परम पूज्य गुरुमाऊलींच्या (टीप २) अखंड स्मरणात असणारी ही बिंदाआई ।
९. तहानभूक विसरून गुरुकार्यासाठी झटणारी ही बिंदाआई ।
१०. सनातनच्या चराचरात असणारी ही बिंदाआई ।
११. जिचा भाव पाहून आपलाही भाव जागृत होईल, अशी ही बिंदाआई ।
१२. कृतज्ञतेतील शब्दही स्वतःला अपूरे समजून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते, अशी ही आमची बिंदाआई ।
टीप १ – बिंदाआई – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
हे गुरुमाऊली, अशी गुरुरूपी आई दिल्याविषयी आम्ही सर्व साधक तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.९.२०२०).
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |