आता भाजप आणि रा.स्व. संघ यांचे नेते ‘पी.एफ्.आय.’चे लक्ष्य
मुंबई – भाजप आणि रा.स्व. संघ यांचे अनेक मोठे नेते ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चेे (‘पी.एफ्.आय.’चे) लक्ष्य असल्याची माहिती पुढे येत आहे. नागपूरचे संघ मुख्यालयही ‘पी.एफ्.आय.’चे लक्ष्य आहे. दसर्याच्या दिवशी होणार्या संघाच्या पथ संचालनाची माहिती ‘पी.एफ्.आय.’च्या सदस्यांनी गोळा केल्याचे म्हटले जात आहे.