अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून होत आहे शिखांचा छळ !
अफगाणिस्तानमधून ५५ अफगाण शीख भारतात परतले !
नवी देहली – अफगाणिस्तानातील ५५ शीख नागरिकांना एका विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. तालिबानी राजवटीत अत्याचार सहन करणार्या अल्पसंख्यांकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकारने या सर्वांना तेथून बाहेर काढले. या शीख नागरिकांनी भारतात पोचल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयीची माहिती दिली.
A special flight, carrying 55 Afghan Sikh minorities fleeing from Afghanistan, has arrived in India, as a part of efforts to evacuate the distressed minorities in the Taliban-led nationhttps://t.co/ZgjzyI9grs
— WION (@WIONews) September 26, 2022
१. अफगाणी शीख बलजीत सिंह म्हणाले की, अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मला ४ मास कारागृहात डांबून ठेवले होते. तालिबान्यांनी आमची फसवणूक केली असून त्यांनी कारागृहात आमचे केस कापले. मी भारतात आणि माझ्या धर्मात परतल्यावियी फार आनंदी आहे. आम्ही भारत सरकारचे अत्यंत आभारी आहोत. त्यांनी आम्हाला तातडीचा ‘व्हिसा’ दिला आणि आम्हाला भारतात पोचण्यास साहाय्य केले.
२. अन्य एक अफगाणी शीख सुखबीर सिंग खालसा यांनी सांगितले की, आमच्यापैकी अनेकांची कुटुंबे अजूनही अफगाणिस्तानात आहेत. अनुमाने ३० ते ३५ लोक अजूनही अफगाणिस्तानात अडकले आहेत.
संपादकीय भूमिका
|