अमरावती येथे बालकांच्या विशेष विभागामध्ये आग !
आधुनिक वैद्यांनी समयसूचकता दाखवत ३७ बालकांचे प्राण वाचवले !
अमरावती – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या विशेष दक्षता कक्षातील (एस्.एन्.सी.यू) ‘व्हेंटिलेटर’ला आग लागल्यामुळे तब्बल ३७ बालकांचे प्राण धोक्यात आले होते; परंतु त्याच वेळी दैनंदिन पडताळणीसाठी (राऊंडसाठी) पोचलेल्या आधुनिक वैद्यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे सर्व बालकांचे प्राण वाचले. दक्षतेचा भाग म्हणून २५ बालकांना त्याच रुग्णालयातील इतर विभागांत स्थानांतरीत केले असून इतर १२ बालकांना वेगवेगळ्या खासगी, सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांत उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. ही घटना २५ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता घडली.