‘पी.एफ्.आय’च्या महाराष्ट्र अध्यक्षाला संभाजीनगर येथून अटक
संभाजीनगर – देशविरोधी कारवायांत गुंतलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या विरोधात महाराष्ट्रातील आतंकवाद विरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) धडक कारवाई चालू केली आहे. ‘ए.टी.एस्’च्या पथकाने येथून ‘पी.एफ्.आय.’ संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष शेख नासीर उपाख्य नदवी याला अटक केली. न्यायालयाने आरोपी शेख याला २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Maharashtra PFI arrests: Suspicious materials seized by ATS available on Internet, says daughter of accusedhttps://t.co/CMLN06J4ux
— Express Mumbai (@ie_mumbai) September 24, 2022
आतंकवाद्यांना पैसा पुरवत असल्याच्या संशयावरून ‘पी.एफ्.आय.’चा शेख इरफान शेख सलीम उपाख्य इरफान मिल्ली, सय्यद फैजल सय्यद खलील, परवेजन खान मुजमिल खान आणि अब्दुल हादी अब्दुल रौफ अशा ४ जणांना ‘ए.टी.एस्.’ने यापूर्वीच अटक केली आहे. नासीर शेख याची चौकशी चालू होती. नासीर याच्या विरोधात देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे.
संपादकीय भूमिकादेशविरोधी कारवाया करणारे देशविरोधी असल्याने त्यांना आजन्म कारावासाची कठोर शिक्षा केली पाहिजे ! |