अनेक दैवी कार्ये करणारा आणि निर्गुणाची अनुभूती देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा कक्ष !
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बसत असलेली आसंदी निर्गुण वाटणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बसतात, ती आसंदी मला शांत आणि निर्गुण स्वरूपात असल्याचे वाटते. त्या आसंदीला नमस्कार केल्यानंतर ‘श्रीसत्शक्ति ताईंनाच नमस्कार करत आहोत’, असे मला जाणवते.
२. ‘श्री महालक्ष्मीचा कक्ष’ असल्याची अनुभूती येणे
२ अ. खोली साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत असून ‘तो निर्गुण कक्ष आहे’, असे वाटणे : एकंदरीत खोलीमध्ये मोठी पोकळी असल्यासारखे मला वाटते. खोलीतील लादी आरशासारखी गुळगुळीत झाली असून त्यामध्ये मला माझे प्रतिबिंब दिसते. श्रीसत्शक्ति ताई खोलीत नसतांनाही ‘खोली साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करते’, असे मला वाटते. ‘श्रीसत्शक्ति ताईंच्या सहवासाने खोली निर्गुण अवस्थेत गेली आहे’, असे मला वाटते.
२ आ. कक्षातून शक्ती प्रक्षेपित होऊन अनेक दैवी कार्ये चालू असल्याचे जाणवणे : या खोलीतून ‘एकाच वेळी अनेक दैवी कार्ये’ चालू असल्याचे मला जाणवते. हा साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचा कक्ष आहे. ‘प्रत्येक प्राणीमात्राची उन्नती होण्यासाठीची शक्ती या कक्षातूनच कार्यान्वित होत असते’, असे मला जाणवते.
२ इ. कक्षात आल्यावर विविध देवतांची रूपे डोळ्यांसमोर येऊन कक्ष म्हणजे ‘देवलोक’ असल्याची अनुभूती येणे : या कक्षात आल्यावर मला वेगळ्याच लोकामध्ये आल्याची अनुभूती येते. ‘हा कक्ष साक्षात् देवलोकच आहे’, असे मला वाटते. या कक्षात आल्यावर शिव-शक्ति, श्रीविष्णु, दत्त आणि विविध देवींची रूपे आपोआपच माझ्या डोळ्यांसमोर येतात. त्या वेळी वाटते, ‘श्रीसत्शक्ति ताई सर्व देवतांना या कक्षातूनच आवाहन करतात आणि सर्व देवता येऊन सर्वत्रच्या साधकांना साधनेसाठी साहाय्य करतात. या अनुभूतींचा केंद्रबिंदू म्हणजे, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा कक्ष आहे’, असे मला वाटते. साधकांना तशा अनुभूतीही येतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०२१)
खोलीतील देवतांच्या मांडणीतील सर्व देवता हिंदु राष्ट्रासाठी वाईट शक्तींशी युद्ध करत असल्याचे जाणवणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीत त्या ज्या आसंदीवर (सोफ्यावर) बसतात, तिथे त्यांच्या उजव्या हाताला असणार्या देवतांच्या मांडणीत श्री कालीमाता, श्री महालक्ष्मी, श्री गणपति अशा देवतांच्या मूर्ती आणि कलश आहे. त्या ठिकाणी मला पुष्कळ मारक तत्त्व जाणवते. ‘या सर्व देवता हिंदु राष्ट्रासाठी वाईट शक्तींशी सुक्ष्मातून युद्ध करत आहेत’, असे मला जाणवते. समोरील बाजूला असणारी श्रीकृष्णाची लाकडी मूर्ती आणि गुरुपादुका पाहिल्यावर माझे मन निर्विचार होऊन ध्यान लागते. ‘त्या स्थितीतून बाहेर न येता ध्यानावस्थेत रहावे’, असे मला वाटते.
– श्री. शंकर नरुटे, गोवा. (२७.१२.२०२१)
|