श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनाविषयक मार्गदर्शन
१. प्रयत्नांना तळमळीची जोड दिल्यास आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होणार आहे !
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले आहे, तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. भावजागृतीचे प्रयत्न, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन प्रक्रिया, तसेच सेवा करतांना तिला तळमळीची जोड दिली, तर आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होईल.
२. कठोर प्रयत्न केले, तरच साधनेत प्रगती होते !
‘कुंभाराला एखादे मातीचे भांडे बनवण्यासाठी प्रथम माती चाळावी लागते. माती एकसारखी कालवावी लागते. लहानसे भांडे बनवण्यासाठी एवढी प्रक्रिया करावी लागते. असे आहे तर देवाशी एकरूप होण्यासाठी साधनेचे कठोर प्रयत्न करावे लागणारच ना !
३. क्रियमाण १०० टक्के वापरावे !
आपण काही वेळा ‘अमुक एक केले नाही, तरी देवाच्या कृपेने काही अडचण आली नाही’, असे अनुभव सांगतो किंवा ऐकतो. त्या वेळी आपले क्रियमाण योग्य न वापरल्यामुळे देवाला तेथे अधिक शक्ती व्यय करावी लागलेली असते. असे होऊ नये म्हणून आपले १०० टक्के क्रियमाण वापरावे.
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ