आर्थिक घोटाळ्यातील आरोपी अमित चांदोले यांचा दोषमुक्त अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मुंबई – आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांचा दोषमुक्त अर्ज पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने फेटाळला. आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा रहित करण्याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयात दिला होता. चांदोले आणि ‘टॉप्स सिक्युरिटी’चे माजी संचालक मराठा शशिधरन् यांनी घोटाळ्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी केलेल्या अर्जाला ईडीने विरोध केला. अहवाल प्रविष्ट केल्यापासून ९० दिवस झाले नसतांना त्याला कुणीही आव्हान देऊ शकत असल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळला.