‘भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’त शास्त्रीय संगीत, बासरी, तबला, सतार, हार्मोनियम आणि संगीतनिर्मिती यांवर अभ्यासक्रम चालू होणार !
महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य निर्णय !
मुंबई, २४ सप्टेंबर (वार्ता.) – ‘भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’त संगीत निर्मिती आणि ध्वनी अभियांत्रिकी (म्युझिक प्रॉडक्शन अँड साऊंड इंजिनिअरिंग) यांसह शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून शास्त्रीय संगीत, भारतीय बासरी, तबला, सतार आणि हार्मोनियम वादन हे प्रमाणपत्रित अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाने २३ सप्टेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढला आहे.
Lata Mangeshkar : आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम 28 सप्टेंबरला होणार सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेhttps://t.co/XWRwtPlaYS#latamangeshkar #marathinews#eknathshinde#bharatratnalatadinanathmangeshkar#internationalmusiccollege
— ABP माझा (@abpmajhatv) September 21, 2022
या अभ्यासक्रमांची शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची राखण्यासाठी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळामध्ये उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर हे सदस्य म्हणून काम पहाणार आहेत. हे सर्व अभ्यासक्रम १ वर्षाचे असून प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संख्यात्मक मर्यादा २५ इतकी आहे. हे अभ्यासक्रम सिद्ध करण्यासाठी नामवंत आणि तज्ञ कलाकार अन् संबंधित संस्था यांचे साहाय्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मानधन देण्यात येणार आहे. परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी ६ अध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे.