हिंदूंच्या विरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ! – अमेरिकन संघटना
वॉशिंग्टन – अमेरिका आणि जगात अनेक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. हिंदूंविषयी द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे अमेरिकन वैज्ञानिक संस्था ‘नेटवर्क कॉन्टेजिअन रिसर्च इन्स्टिट्यूट’ने म्हटले आहे. या संस्थेने ब्रिटन आणि कॅनडा येथे हिंदूंवर चालू असलेल्या आक्रमणांचा संदर्भ देत ही चिंता व्यक्त केली.
हिंदुओं के खिलाफ बनाया जा रहा नफरत का माहौल, अमेरिकी संगठन ने किया ये खुलासाhttps://t.co/KbKEkSNMeL
— ZEE HINDUSTAN (@ZeeHindustan_) September 22, 2022
१. या संघटनेचे सहसंस्थापक आणि मुख्य विज्ञान अधिकारी जोएल फिंकेलस्टीन यांनी अमेरिकेच्या संसद भवन संकुलात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही माहिती दिली.
२. जोएल यांनी ‘हिंदू-अमेरिकन समुदाया’च्या सदस्यांना सांगितले की अमेरिका आणि कॅनडा येथे हिंदूंच्या मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. इंग्लंडमध्ये हिंदूंना अगदी खालच्या पातळीवर विरोध केला जात आहे. जगभरात हिंदूंच्या विरोधात द्वेष वाढण्याची शक्यता आहे.
Dangerous hybridisation of hate against Hindus globally, says U.S.-based research organization. STOP IT.https://t.co/QFf9dVLub8.@POTUS @VP @trussliz @10DowningStreet @UN @PMOIndia @DrSJaishankar @KremlinRussia_E @Isaac_Herzog @IsraeliPM @nytimes @Reuters @washingtonpost @AP
— 🛕Upananda Brahmachari 🖊️ (@HinduExistence) September 22, 2022
३. या कार्यक्रमात अमेरिकन संसदेतील एकमात्र बौद्ध खासदार हँक जॉन्सन यांनी अमेरिकेत हिंदूंबद्दल द्वेषाच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली. ‘या द्वेषाच्या विरोधात आपण संघटित व्हायला हवे’, असे ते म्हणाले.