मुंब्रा (ठाणे) येथील एम्.आय.एम्. पक्षाच्या कार्यालयावर अज्ञातांचे आक्रमण !
मुंब्रा – येथील एम्.आय.एम्. पक्षाच्या कार्यालयावर १० ते १२ अज्ञातांनी आक्रमण केले असून त्यात दोन जण गंभीर घायाळ झाले आहेत. आक्रमणकर्त्यांनी कार्यालयात घुसून लोखंडी रॉड, तलवारींसह धारदार शस्त्रांनी २ कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. तसेच कार्यालयाचीही तोडफोड केली. २१ सप्टेंबरच्या रात्री ८ ते ९ या काळात घडलेली ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याप्रकरणी अज्ञात आक्रमणकर्त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.