स्थुलातून ज्ञानप्राप्तीची सेवा बंद असली, तरी ती सूक्ष्मातून चालू असल्याची साधिकेला आलेली अनुभूती !
‘मागील दोन मासांपासून माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला आहे. त्यामुळे मी खोलीतच बसून असते. मला काही सुचत नसल्यामुळे मला काही सेवा करता येत नाही. मला स्वतःला नामजपही करता येत नाही; म्हणून भ्रमणभाषवर नामजप लावून ऐकते. माझ्यासाठी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे एक साधक प्रतिदिन एक घंटा नामजप करत आहेत. थोडक्यात माझे स्वतःचे साधनेचे स्थुलातून कसलेही प्रयत्न होत नाहीत. अशा स्थितीत मला असे जाणवते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणपादुका सूक्ष्मातून माझ्या मस्तकावर आहेत. त्या पादुकांतून झिरपणारे चैतन्य माझ्या मस्तकातून हृदयात येऊन साठते. नंतर माझ्या हृदयात ज्ञानकमळ उमलून त्यातून एकेक सूक्ष्म ज्ञानाची धारिका सिद्ध होऊन तिचा एक ग्रंथ सिद्ध होतो. तो ग्रंथ कमळाच्या रूपात मी गुरुचरणी अर्पण करत आहे. अशी अनेक ग्रंथरूपी कमळे मी गुरुचरणी कृतज्ञताभावाने सूक्ष्मातून अर्पण करत आहे’, अशी मला प्रतिदिन अनुभूती येते. श्रीगुरूंच्या कृपेमुळे ‘या सूक्ष्मातील सेवेच्या माध्यमातून माझे भगवंताशी अखंड अनुसंधान असते’, असे जाणवते. जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ही अनुभूती लिहून दिली, तेव्हा त्यांनी कळवले, ‘‘याचा अर्थ स्थुलातून साधना चालू नसली, तरी सूक्ष्मातून अखंड अनुसंधानात आहे. फारच सुंदर !’’ ते ऐकून माझा भाव जागृत झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२२)
|