महिलेची छेड काढणार्या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद !
नगर – शहरातील देहली गेट परिसरात एक विवाहित तरुणी आपल्या मैत्रिणीसमवेत घराबाहेर गप्पा मारत असतांना आरोपी फैजान कलीम बागवान हा त्या विवाहित तरुणीच्या अंगावर दुचाकी गाडी घालून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव करून अश्लील शब्द वापरत होता. ‘तू मला आवडतेस, गाडीवर बस, गाडीवर बसली नाहीस, तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन’, असा दम दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी विवाहित तरुणीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फैजान कलीम बागवान याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद असलेल्या आरोपीवर कडक कारवाई करून त्याच्यावर मोक्का लावण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना आणि भाजप यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले.
फैजान कलीम बागवान हा सराईत गुन्हेगार असून या आधी त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे नोंद केले आहेत. तोफखाना पोलीस ठाणे आणि कोतवाली पोलीस ठाणे येथे वर्ष २०११ पासून ७ विविध गंभीर गुन्हे नोंद असून मध्यंतरीच्या काळात येथील तारकपूर परिसरातही त्याला छेड काढतांना पकडण्यात आले होते. त्या वेळेसही नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. (अशा आरोपींना वेळीच कठोर शिक्षा का दिली जात नाही ? किती महिलांची छेड काढून झाल्यानंतर पोलीस संवेदनशील होऊन त्याला कठोर शिक्षा देणार आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या मंडळामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख, नगरसेवक, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष, ओबीसी मोर्चा, व्यापारी महासंघ, मराठा महासंघ यांचे कार्यकर्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे रामेश्वर भूकन आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकानेहमी महिलांची छेड काढणार्यांमध्ये धर्मांधांचा समावेश असणे, गंभीर आणि संतापजनक आहे. धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्याचा हा परिणाम ! |