उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार !
|
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या प्रकरणात शिंदे गटाकडून प्रविष्ट करण्यात आलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर करण्याविषयी उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली होती. यावरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची अनुमती ठाकरे गटाला देण्यात आली आहे.