नवग्रह मंत्रपठण करतांना साधकांना आलेल्या अनुभूती
१. ‘पक्षी मंत्रपठण ऐकायला आले आहेत’, असे वाटणे : ‘२९.६.२०२२ या दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत आम्ही आश्रमात मंत्रपठण करत होतो. साधारणपणे ३.१५ वाजता आमच्या समोर (आगाशीच्या कट्ट्यावर) भारद्वाज पक्षी येऊन बसला. संपूर्ण मंत्रपठण होईपर्यंत तो तेथेच बसला होता. याच वेळी तेथे एक पोपटही येऊन गेला. तेव्हा जणू काही ‘पक्षी मंत्रपठण ऐकायला आले आहेत’, असे आम्हाला वाटले.
२. त्या दिवशी वातावरणामध्ये दैवी सुगंध येत होता.
३. मंत्रपठण एकाग्रतेने आणि भावपूर्ण होऊन आम्हाला आनंदाची अनुभूती आली.
४. मंत्रपठण झाल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता आम्हाला ‘पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर आरूढ झाले आहेत’, ही आनंदवार्ता समजली.
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भारद्वाज पक्षी, पोपट आणि वातावरणातील दैवी सुगंध यांच्या माध्यमातून आनंदवार्ता दिली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– मंत्रपठण करणारे साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |